दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 05:36 PM2019-11-30T17:36:10+5:302019-11-30T17:36:18+5:30

र्धमान नगर येथील समर्थ घवघवे नामक युवक जागेवरच ठार झाला तर दुसऱ्या दुचाकीचा चालक हेल्मेटमुळे वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले.

Two-wheeler collision face-to-face; One killed | दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार

Next

अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुकाराम चौक ते कौलखेड या दरम्यान असलेल्या रिंग रोडवर दोन दुचाकींमध्ये शनिवारी सायकांळी ४ वाजताच्या सुमारास भिषन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात वर्धमान नगर येथील समर्थ घवघवे नामक युवक जागेवरच ठार झाला तर दुसऱ्या दुचाकीचा चालक हेल्मेटमुळे वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले.
तुकाराम चौक ते कौलखेड या दरम्यान असलेल्या रिंग रोडवरील जानोरकर मंगल कार्यालयाजवळ दोन दुचाकींमध्ये समोरा समोर धडक झाली. दोन्ही दुचाकीचानक क्षमतेपेक्षा अधीक वेगाने असल्यामुळे या भिषन अपघातात रिंग रोडवरीलच वर्धमान नगर येथील रहिवासी समर्थ ज्ञानेश्वर घवघवे (१७) या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने परिसरातच असलेले स्थायी समिती सभापती विनोद मापारी त्यांचे मीत्र गीरीष इंगळे व सागर चव्हाण यांनी या युवकाला गंभीर जखमी असल्याचे पाहून तातडीने एका आॅटोमधून खासगी हॉस्पीटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच युवकाचा जागेवरच मृत्यू झाल्याचे सांगीतले. एका दुचाकीवर असलेल्या समर्थचा मृत्यू झाला मात्र दुसºया दुचाकीवर असलेला युवकही सिमेंट रोडवर गंभीर ठिकाणी कोसळला मात्र डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे त्याचे प्राण वाचल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच खदानचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी दुचाकीचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.

 

Web Title: Two-wheeler collision face-to-face; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.