भरधाव ॲपेच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:21 AM2021-01-19T04:21:13+5:302021-01-19T04:21:13+5:30
अकाेला : खदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काैलखेड चाैकासमाेर असलेल्या रिजनल वर्कशाॅपसमाेर एका भरधाव ॲपेने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना साेमवारी सायंकाळी ...
अकाेला : खदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काैलखेड चाैकासमाेर असलेल्या रिजनल वर्कशाॅपसमाेर एका भरधाव ॲपेने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना साेमवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या अपघातात अंशुमन काेले यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांचा मित्र वेदांत प्रकाश गाेंड हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बार्शीटाकळी येथून अकाेला शहरात येत असलेल्या ॲपे चालकांचा प्रचंड धुडगूस सुरु आहे. भरधाव असलेल्या अशाच एका ॲपेचा बळी एक युवक ठरला असून या राेडवरील बेफाम वाहतुकीवर पाेलिसांनी आता नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. बंजारा काॅलनी येथील रहिवासी अंशुमन काेले व त्याचा मित्र वेदांत प्रकाश गाेंड हे दाेघे दुचाकीने जात असतांना त्यांना भरधाव येणाऱ्या ॲपेने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अंशुमन काेले याचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याचा मित्र वेदांत गाेंड जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खदानचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनतर ॲपे चालकास ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या राेडवर आठ दिवसातील हा दुसरा अपघात असून यापूर्वी एका महिलेचा काैलखेड चाैकात अपघातात मृत्यू झाला हाेता. त्यानंतर आता पुन्हा एका युवकाचा बळी गेल्याने येथील वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे.
अतिक्रमण प्रचंड वाढले
काैलखेड राेडवर माेठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या रस्त्यांवर अतिक्रमणामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या राेडवरील अतिक्रमण काढण्याची मागणी हाेत आहे. आठ दिवसात दाेन बळी गेल्याने या राेडवरील वाहतूक आता धाेकादायक ठरत आहे.