तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयातून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:14 AM2021-06-05T04:14:53+5:302021-06-05T04:14:53+5:30

तेल्हारा तालुक्यातील ग्राम कोठा येथील रहिवासी सागर साहेबराव हेरोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी दुचाकी क्रमांक (एमएच ३०, वाय ११४५) ...

Two-wheeler lampas from a rural hospital in Telhara | तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयातून दुचाकी लंपास

तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयातून दुचाकी लंपास

Next

तेल्हारा तालुक्यातील ग्राम कोठा येथील रहिवासी सागर साहेबराव हेरोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी दुचाकी क्रमांक (एमएच ३०, वाय ११४५) ग्रामीण रुग्णालयात दि. २ जून रोजी उभी केली होती. त्याच दिवशी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने लंपास केली. शोध घेऊनही मोटरसायकल दिसून न आल्याने शुक्रवार, दि. ४ जून रोजीत दिलेल्या फिर्यादीनुसार, तेल्हारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या ३७९ कलमानुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुरेश काळे करीत आहेत.

-----------------------

अपघातात दोन जण जखमी

बार्शीटाकळी: तालुक्यातील महान-पिंजर रस्त्यावर दुचाकी व कारच्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. बार्शीटाकळी तालुक्यातील महान-पिंजर मार्गावर दगडपारवा नजीक कार क्र. (एमएच ३० ए १८३१) व दुचाकी क्रमांक (एमएच ३७ डी ५०५८) मध्ये धडक झाल्याने अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

--------------------

Web Title: Two-wheeler lampas from a rural hospital in Telhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.