टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:03 PM2019-06-11T13:03:43+5:302019-06-11T13:14:58+5:30

टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहाँगिरनजीकच्या राजहंस ढाब्यासमोर मंगळवारी सकाळी घडली.

Two wheeler rider killed in an accident on highway | टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देसचिन विठ्ठल पवार (रा.काखेड, ता. बार्शीटाकळी) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.सचिन विठ्ठल पवार हे त्यांच्या एम.एच. ३० यू ७८१३ क्रमांच्या दुचाकीने बोरगाव मंजूकडे जात होते. टँकरच्या चालकाने सचिन पवार यांच्या दुचाकीस ‘टेकओव्हर’ करण्याच्या प्रयत्नात मागून जोरदार धडक दिली.

बाभूळगाव जहाँगिर (अकोला ): भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी  झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहाँगिरनजीकच्या राजहंस ढाब्यासमोर मंगळवारी सकाळी घडली. सचिन विठ्ठल पवार (रा.काखेड, ता. बार्शीटाकळी) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे, तर सुरेश जाधव असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील कातखेड येथील सचिन विठ्ठल पवार व सुरेश जाधव हे दोघे त्यांच्या एम.एच. ३० यू ७८१३ क्रमांच्या दुचाकीने बोरगाव मंजूकडे जात होते. दरम्यान, सकाळी ९ वाजताचे दरम्यान एन.एल.०१ एन-११०१ क्रमांच्या टँकरच्या चालकाने सचिन पवार यांच्या दुचाकीस ‘टेकओव्हर’ करण्याच्या प्रयत्नात मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार सचिन पवार चिरडल्या गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश जाधव हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक विस्कळित झाली होती.  एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन विठ्ठल पवा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. जखमी झालेल्या सुरेश जाधव यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 

Web Title: Two wheeler rider killed in an accident on highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.