राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 13:12 IST2021-07-10T13:11:42+5:302021-07-10T13:12:22+5:30
Murtijapur Accident News : कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन बाजार समिती जवळ कारने दुचाकीस दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना ९ जुलै रोजी रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान घडली. मोहम्मद मोईन अंसारी (२७) राहणार मूर्तिजापूर असे मृतकाचे नाव आहे.
कारंजा बाय पास चौकानजिक पंचरचे दुकान चालविणाऱ्या मोहंमद मोईन अन्सारी (२७) याचा अपघातात मृत्यू झाला. त्याचा भाऊ मोहंमद कयूम अन्सारी (३२) याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोहंमद मोईन आपल्या घरी जात असतांना त्याच्या दुचाकी क्रमांक एमएच ३० एडी ३२२४ ला समोरून येणाऱ्या कार क्रमांक एमएच ०२ बीजे ३६७७ ने धडक दिली. त्यात मोईन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शहर पोलीसांनी कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.