अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 10:50 IST2020-11-29T10:47:58+5:302020-11-29T10:50:40+5:30
Accident News दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
पातूर: पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवीन बसस्थानकासमोर दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अकोला येथील प्रसाद पाठक हे दुचाकीने साखरखेडा येथून अकोल्याला घरी परत येत असताना अकोला-पातूर मार्गावर पातूर येथील नवीन बसस्थानकासमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने प्रसाद पाठक हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.