दुचाकी चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाइ
By आशीष गावंडे | Published: July 9, 2024 10:12 PM2024-07-09T22:12:31+5:302024-07-09T22:12:49+5:30
यावेळी चाेरी झालेल्या तब्बल दहा दुचाकी पाेलिसांनी जप्त केल्या आहेत.
अकोला: शहरासह जिल्ह्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची चाेरी हाेत असल्याची गंभीर दखल घेत जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कामाला लावले असता, मंगळवारी दाेन अट्टल दुचाकी चाेरट्यांना अटक करण्यात आली. यावेळी चाेरी झालेल्या तब्बल दहा दुचाकी पाेलिसांनी जप्त केल्या आहेत.
चारचाकी तसेच दुचाकी वाहन चाेरल्यानंतर चेसीस नंबर पासून ते वाहनातील अनेक पार्ट बदलण्यासाठी माेठे रॅकेट सक्रिय आहे. पाेलिस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतरही पाेलिसांकडून फारशी दखल घेतली जात नाही. वाहनांच्या चाेरीचे प्रमाण पाहता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके व त्यांच्या पथकाला कामाला लावले. खबऱ्यांनी दिलेल्या टिपवरुन मंगळवारी फिरोज उसमान मुन्नीवाले (३८), युसुफ तुकडु बहेरेवाले (३४)दाेन्ही रा. गवळीपुरा यांना ताब्यात घेवून कसुन विचारपुस केली असता त्यांनी दुचाकी चाेरीचा भंडाफाेड केला. यावेळी त्यांच्याकडून दहा दुचाकी अंदाजे किंमत ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाइ ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके, ‘पीएसआय’ गोपाल जाधव, दशरथ बोरकर, फिरोज खान, गोकुळ चव्हाण,खुशाल नेमाडे, मोहम्मद आमीर, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभीषेक पाठक, अन्सार अहमद, स्वप्नील खेडकर यांनी केली.
आराेपींकडून पाच गुन्ह्यांची कबुली
दाेन्ही आराेपींनी रामदास पेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत तीन व सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत दाेन असे एकूण पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. दाेन्ही आराेपींना रामदास पेठ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून नागरिकांनी रामदास पेठ पाेलिसांसाेबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.