गायगाव जवळ दुचाकीची प्रवासी वाहनाला धडक; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:21 AM2017-12-01T01:21:02+5:302017-12-01T01:24:46+5:30
भरधाव दुचाकीने प्रवासी वाहनाला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना ३0 नोव्हेंबर रोजी दुपारी गायगाव येथील वीज वितरण केंद्राच्या समोर घडली. या अपघातात भारिप-बमसंचे बाळापूर तालुकाध्यक्ष भारत निखाडे यांच्यासह तिघे जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गायगाव : भरधाव दुचाकीने प्रवासी वाहनाला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना ३0 नोव्हेंबर रोजी दुपारी गायगाव येथील वीज वितरण केंद्राच्या समोर घडली. या अपघातात भारिप-बमसंचे बाळापूर तालुकाध्यक्ष भारत निखाडे यांच्यासह तिघे जखमी झाले.
मोरगाव भाकरे येथील अमित शेगोकार हा दुचाकी क्र एमएच ३0 पीआर ९७५४ ने जात होता. दरम्यान, गायगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर समोरून येत असलेले प्रवासी वाहन क्र. एमएच ३0 एए ४५५0 ला दुचाकीने जबर धडक दिली.
यामध्ये दुचाकीस्वार अमित शेगोकार हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर प्रवासी वाहन उलटल्याने त्यामध्ये असलेले भारिप- बमसं बाळापूर तालुकाध्यक्ष भारत निखाडे, विश्वनाथ निखाडे, दीपक वानखडे आदींही जखमी झाले. जखमींना रवी पाटील, पराग गवई यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मदत केली. आमदार बळीराम सिरस्कार यांनी सवरेपचार रुग्णालयात भेट देऊन जखमी निखाडे यांच्यासह कार्यकर्त्यांची विचारपूस केली.