अकोल्यात युवकाची हत्या करणारे दाेघे जेरबंद, जुने शहर पाेलिसांची कारवाई

By सचिन राऊत | Published: August 12, 2023 05:23 PM2023-08-12T17:23:13+5:302023-08-12T17:23:45+5:30

अतुल उर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर रा. न्यू हिंगणा व कळबेश्वर येथील अभिजित वानखडे अशी आराेपींची नावे आहेत.

Two who killed a youth in Akola jailed, old city police action | अकोल्यात युवकाची हत्या करणारे दाेघे जेरबंद, जुने शहर पाेलिसांची कारवाई

अकोल्यात युवकाची हत्या करणारे दाेघे जेरबंद, जुने शहर पाेलिसांची कारवाई

googlenewsNext

अकोला : जुने शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा येथे एका युवकाची डाेक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या दाेन आराेपींना अटक करण्यात जुने शहर पाेलिसांना यश आले आहे. अतुल उर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर रा. न्यू हिंगणा व कळबेश्वर येथील अभिजित वानखडे अशी आराेपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमाेर हजर केले असता दाेन्ही आराेपींना पाेलिस काेठडी सुनावली आहे.
हिंगणा फाटा परिसरात शेख शाहरुख शे. हसन (३०, रा. सोनटक्के प्लॉट) या युवकाची गुरुवारी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली हाेती.

या प्रकरणी जुने शहर पाेलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आराेपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असता काही तासांतच हत्या करणारे अतुल ऊर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर, रा. न्यू हिंगणा व कळबेश्वर येथील अभिजित वानखडे या दाेघांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलिस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, जुने शहरचे ठाणेदार पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलिस निरीक्षक रवींद्र लांडे, प्रदीप घटे, संताेष मेंढे, शैलेश पाचपाेर, छाेटू पवार, सागर शिरसाट, पंकज सूर्यवंशी, पवन डांबलकर, श्याम पाेधाडे, अर्जुन खंडारे यांनी केली.

Web Title: Two who killed a youth in Akola jailed, old city police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.