शासकीय वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार महिला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 11:46 AM2021-07-17T11:46:53+5:302021-07-17T11:47:36+5:30

Two woman seriously injured in an accident near Murtijapur : या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही महीला गंभीर जखमी झाल्या.

Two woman seriously injured in an accident near Murtijapur | शासकीय वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार महिला गंभीर

शासकीय वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार महिला गंभीर

googlenewsNext

मूर्तिजापुर : शासकीय वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना पळसो बढे- अकोला मार्गावर मार्गावर कौलखेड़ जहाँगीर फाट्या जवळ १६ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली. 
            माधुरी राहुल पवार (२८) व सोनी मंगेश पवार (२८) राहणार स्टेशन विभाग मूर्तिजापूर या दोन महिला आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० बी के ५८२५ या दुचाकीवरुन मूर्तिजापूरकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव शासकीय वाहन क्रमांक एमएच ३० एच २८९ ने जोरदार धडक दिली. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही महीला गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांना तात्काळ उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर सदर प्रकारणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Web Title: Two woman seriously injured in an accident near Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.