दोन महिलांकडून परस्परांच्या पतीविरुद्ध विनयभंगाची तक्रार

By admin | Published: January 14, 2017 01:29 AM2017-01-14T01:29:55+5:302017-01-14T01:29:55+5:30

तेल्हारा तालुक्यातील नर्सीपूरची घटना.

Two women complain of molestation against their husband | दोन महिलांकडून परस्परांच्या पतीविरुद्ध विनयभंगाची तक्रार

दोन महिलांकडून परस्परांच्या पतीविरुद्ध विनयभंगाची तक्रार

Next

तेल्हारा, दि. १३- तालुक्यातील पंचगव्हाण नर्सीपूर येथील दोन महिलांनी परस्परविरोधी पतीविरुद्ध तक्रारी तेल्हारा पोलिसांत १२ जानेवारीच्या रात्री दिल्यावरून दोन्ही पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. नर्सीपूर येथील ३0 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती किराणा दुकानामधून सामान घेऊन येत असताना आरोपी राहुल सोनाजी वानखडे (२२), रवी सोनाजी वानखडे (२६) यांनी विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केली असता तिचा पती मध्ये आल्यानंतर आरोपीने पतीच्या डाव्या हातावर वस्तरा मारून जखमी केले. पोलिसांनी दोन्ही नमूद आरोपींविरुद्ध कलम ३२४, ३५४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दुसर्‍या फिर्यादी २३ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संजय बलदेव मोहोड (३५) याने फिर्यादी महिला घरात एकटी असताना विनयभंग केला. आरडाओरड केली असता आरोपीने पळ काढला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४ (अ), ४५२ नुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपी संजय मोहोड हा जखमी असल्याने अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र करणकर करीत आहेत.

Web Title: Two women complain of molestation against their husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.