शासकीय वाहनाच्या धडकेत दोन महिला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:19+5:302021-07-18T04:14:19+5:30

मूर्तिजापूर : पळसो बढे-अकोला मार्गावरील कौलखेड जहाँगीर फाट्याजवळ शासकीय वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ...

Two women seriously injured in a government vehicle collision | शासकीय वाहनाच्या धडकेत दोन महिला गंभीर

शासकीय वाहनाच्या धडकेत दोन महिला गंभीर

Next

मूर्तिजापूर : पळसो बढे-अकोला मार्गावरील कौलखेड जहाँगीर फाट्याजवळ शासकीय वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.

माधुरी राहुल पवार (२८) व सोनी मंगेश पवार (२८) (रा. स्टेशन विभाग मूर्तिजापूर) या दोन महिला दुचाकी क्रमांक (एमएच ३० बीके ५८२५) याने मूर्तिजापूरकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव शासकीय वाहन क्रमांक(एमएच ३० एच २८९)ने जोरदार धडक दिली. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनअंतर्गत घडलेल्या या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांना तत्काळ उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Web Title: Two women seriously injured in a government vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.