पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिनीला लागणार दोन वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 02:00 PM2019-08-06T14:00:57+5:302019-08-06T14:01:07+5:30

अकोला: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवटच असून, पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिन्या कामाला आणखी दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे.

Two years to complete the underground drainage of Purna Barrage |  पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिनीला लागणार दोन वर्ष

 पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिनीला लागणार दोन वर्ष

googlenewsNext

अकोला: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवटच असून, पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिन्या कामाला आणखी दोन वर्ष लागण्याची शक्यता असल्याने पाणी जरी साठले तरी हे पाणी शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्ष मिळणार नाही, अशी अवस्था आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत बॅरेजला १२ वक्रद्वार लावण्याची तयारी आहे; परंतु वक्रद्वार कार्यान्वित करण्यासाठी येथे विजेचा पुरवठाच झाला नसल्याचे चित्र आहे.
पूर्णा बॅरेज-२ खारपाणपट्ट्यातील बॅरेज असून, हे बॅरेज बांधून झाल्यास नेरधामणा व या भागातील गावच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तद्वतच अकोलेकरांसाठीही बॅरेजमध्ये पिण्याच्या पाण्याचे आरक्षण राहील; परंतु अद्याप या बॅरेजचे काम पूर्ण झाले नाही. येत्या सप्टेंबरपर्यंत बॅरेजला १२ वक्रद्वार लावण्याचा बेत आहे. तो पूर्ण होतो की नाही, हे वेळच सांगेल. त्यासाठी येथे वीजच नाही. वक्रद्वार जरी लावले तरी शेतकºयांना सिंचनासाठी सध्यातरी पाणी मिळणे कठीणच आहे. शेतापर्यंत पाणी नेण्यासाठीची भूमिगत जलवाहिनीचा नकाशाच तयार नाही. या कामाला ११६ कोटीवर खर्च आहे. आता जरी सर्व प्रक्रियेला सुरुवात केली तरी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मध्येच नवीन तरंग पद्धत अवलंबविण्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असेल तथापि, हा प्रयोग आपल्याकडे यशस्वी होणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भूमिगत नलिकेचा प्रयोग करणे किंवा सरळ पाटचाºया, कॅनॉलच टाकावे लागणार आहे.
कवठा बॅरेजच्या कामातही अडथळा आला आहे. या भागातील लोहारा पुलाचे काम थंड बस्त्यात असल्याने या बॅरेजचे पाणी शेतकºयांना केव्हा उपलब्ध होणार, हा प्रश्नच आहे. कारंजा रमजानपूर प्रकल्पाचे काम पूर्ण झालेच नाही, उमा बॅरेजचे काम ठप्प आहे. काटीपाटी प्रकल्पाला लागणारी सुधारित प्रशासकीय मान्यता शासन दरबारी रखडली आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 

Web Title: Two years to complete the underground drainage of Purna Barrage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.