बैल धुण्यासाठी गेलेले दोन तरुण नदीपात्रात वाहून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 05:49 PM2021-09-06T17:49:55+5:302021-09-06T17:50:01+5:30
Akola News : गोपाल कांबे,सागर कावरे असे वाहुन गेलेल्या तरुणांची नावे आहेत.
बोरगाव मंजू : पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी नदीवर गेलेले कानशिवनी येथील दोन तरुण काटेपूर्णा- पिंजर्डा नदीच्या संगमात वाहून गेले. गोपाल कांबे,सागर कावरे असे वाहुन गेलेल्या तरुणांची नावे आहेत.
कानशिवनी येथील चार मित्र काटेपुर्णा- पिजंर्डा नदीच्या संगमावर गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने चारही शेतकरी पुत्र नदीच्या पात्रात वाहुन जात असताना पार्डी येथील नागरिकांना दिसले. गावकरी मदतीसाठी धावून गेले. दोघांना वाचविण्यात यश आले. गोपाल महादेवराव कांबे (१९) व सागर गोपाल कावरे (२१) हे दोघे शेतकरी पुत्र नदीच्या पात्रात वाहुन गेले. पिंजर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर आपत्कालीन व्यवस्थापन पथकास पाचारण करण्यात आले. वाहुन गेलेल्या तरुणांचा शोध घेणे सुरू आहे.
ऐन शेतकऱ्यांच्या पोळा सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे