दोन तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
By admin | Published: September 17, 2014 02:43 AM2014-09-17T02:43:04+5:302014-09-17T02:43:04+5:30
तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील घटना; पोहताना झाला घात
खंडाळा (तेल्हारा) : येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी म्हणून गेलेल्या १८ वर्षे वयाच्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना १६ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. रात्री उशिरा दोन्ही मुलांचे मृ तदेह सापडले.
खंडाळा येथील रहिवासी असलेले सौरव विनोद डांगे व ज्ञानेश्वर रामेश्वर नांदुरकर हे दोघे तरूण बुधवार १६ सप्टेबरला दुपारी १२ वाजता विनोद डांगे यांच्या वखरणीचे काम सुरू असल्यामुळे शे तात जातो असे घरी सांगून निघून गेले होते. डांगे यांच्या शेताच्या बाजूला गणेश धूळ यांच्या शेतात शेततळे आहे. त्या शेततळ्यात ताडपत्री टाकलेली आहे. तेथे पोहण्यासाठी म्हणून ते दोघेही कुणालाही न सांगता गेले. परंतु , त्या शेततळ्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ते दोघेही हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीमध्ये शिकतात. ते दोघेही सायंकाळपर्यंंत घरी पर त आले नसल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी व नातेवाइकांनी त्यांचा ठिकठिकाणी शोध घेणे सुरू केले. या शोध मोहिमेत अखेर रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास धूळ यांच्या शेततळ्याच्या काठावर त्यांचे कपडे व चपला दिसून आल्या. त्यामुळे शोध घेणार्यांनी शेततळ्यात बॅटरीचा प्रकाशझोत टाकून पाहिले असता दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती खंडाळ्याचे पोलिस पाटील अरूण तायडे व सरपंच सुरेश जाधव यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनला कळविली. त्यानुसार पोलिस रात्री घटनास्थळी पोहोचली व मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.हे वृत्त लिहिपर्यत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती.