बाळापूर-खामगाव मार्गावर कंटेनरची दुचाकीस धडक, अकोल्याचे दोन युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 16:54 IST2018-02-19T16:50:05+5:302018-02-19T16:54:33+5:30
बाळापूर : येथून खामगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वर भरधाव अज्ञात कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अकोल्याचे दोन युवक ठार झाले.

बाळापूर-खामगाव मार्गावर कंटेनरची दुचाकीस धडक, अकोल्याचे दोन युवक ठार
- अनंत वानखडे
बाळापूर : येथून खामगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वर भरधाव अज्ञात कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अकोल्याचे दोन युवक ठार झाले. ही घटना बाळापूर शहरापासून दोन कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी १.१५ वाजता घडली. किशोर मनोहर नांदे (३५) व अजय गंगाधर माळेकर अशी मृतकांची नावे आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.
अकोल्यातील किशोर नांदे आणि अजय माळेकर हे युवक दुचाकी क्र.एमएच ३० व्ही १४०० ने राष्ट्रीय महामार्गाने जात होते. बाळापूर आणि खामगाव तालुक्याच्या सिमारेषेनजीक पिवळा नाल्याजवळ अज्ञात कंटेनरने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये किशोर नांदे हा जागीच ठार झाला तर अजय माळेकर हा गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमी युवकास तातडीने बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान अजय माळेकरचा मृत्यू झाला. या अपघातामुळे राष्टीय महामार्गावर दोन्ही बाजुने मोठी रांग लागली होती. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन वाहतुक सुरळीत केली.या प्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.