गुरुदेव सेवामंडळाचे प्रचारक उद्धवदादा गाडेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 12:05 PM2022-05-11T12:05:14+5:302022-05-11T12:14:43+5:30
Dr\ Uddhavdada Gadekar passed away : डॉ. उद्धवदादा गाडेकर महाराज यांचे बुधवार ११ मे रोजी वयाच्या ५९व्या वर्षी पाटसुल आश्रम येथे निधन झाले.
अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा प्रसार करणारे आजीवन प्रचारक, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे व्रतस्थ व्यक्तिमत्व डॉ. उद्धवदादा गाडेकर महाराज यांचे बुधवार ११ मे रोजी वयाच्या ५९व्या वर्षी पाटसुल आश्रम येथे निधन झाले.
गेल्या ५ महिन्यांपासून ते मेंदूच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर मुंबई येथे शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. २ वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेले संस्कार शिबिर त्यांच्या सूचनेनुसार पाटसुल येथे सुरू असताना आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ही गळ्याच्या कर्करोग रोगाने वयाचे ५९व्या वर्षीच निधन झाले होते. हा दुर्दैवी योगाची आठवण गुरुदेव भक्तांमध्ये आहे राष्ट्रसंतांच्या पार्थिवावर सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आला होता.त्याचवेळी आज पाटसुल आश्रमात उद्धव दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.