उडीद-मूग गेला; ज्वारी-कपाशी पडतेय काळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:09 AM2017-09-22T01:09:00+5:302017-09-22T01:09:05+5:30
तेल्हारा : यावर्षीच्या खरीप हंगामात पीक पेरणीपासूनच अनियमित हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला. उडीद-मुगावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन शून्य झाले. सोयाबीनलासुद्धा फळधारणा पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही, तर सध्या परतीच्या पावसाने कहर करून क पाशी पिकाचे पक्व बोंड व ज्वारीचे कणीससुद्धा काळे पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावर्षीचा खरीप हंगाम हा शेतकर्यांना विविध संकटांचा राहिला. सुरुवातीला पेरणीच्या वेळी पावसाने दडी मारली. त्यानंतर पाऊस आला; परंतु पिकांना मार बसून पिके जोमात येण्यास वेळ लागला. शेतकर्यांनी आहे त्या सिंचन सुविधेवर पिके वाढविली; परंतु अनियमित हवामान व पाण्यामुळे िपकांवर विशेषत: मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी पिकावर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. मूग, उडिदावर मोझ्ॉक नावाचा व्हायरस आल्याने काही भागात शून्य उत् पादन झाले.
सोयाबीन पिकावर ऐन फळधारणेच्या वेळी व्हायरस येऊन शेंगा लागल्या नाहीत. शेतकर्यांनी या पिकाची आशा सोडल्यानंतर कपाशी, ज्वारी पिकाचे उत्पादन तर झाले; पण परतीच्या पावसाने ज्वारीची पक्व कणसे काळी पडत आहेत. जोरदार वार्यासह भरपूर पाऊस पडत असल्याने बागाय तीसह कोरडवाहू कपाशीसुद्धा पसरली आहे. त्यामुळे क पाशीला खालच्या बाजूने लागलेली पक्व बोंडे काळी पडत आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे खरीप पिके गेल्यागत असल्याने शेतकर्यांच्या सर्व आशा रब्बी पिकांवर केंद्रित आहेत.
रब्बी पिके घेताना सर्वांच्या नजरा त्या वान प्रकल्प हनुमानसागराकडे लागतात. हनुमानसागराची पाणी पातळी सध्या ७0 टक्के असून, पाणी आरक्षणाचा प्रश्न सुटल्यास रब्बीच्या हंगामात शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी मिळू शक ते.