अकोल्याच्या लाचखोर इनामदारची सव्वा कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

By admin | Published: October 22, 2015 01:52 AM2015-10-22T01:52:32+5:302015-10-22T01:52:32+5:30

रोख रकमेसह ८५ तोळे सोन्याचे दागिने व फ्लॅटचा समावेश.

Unaccounted amount of Rs | अकोल्याच्या लाचखोर इनामदारची सव्वा कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

अकोल्याच्या लाचखोर इनामदारची सव्वा कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

Next

अकोला : अकोला जिल्हा परिषदेचा उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार याच्या सांगली येथील निवासस्थानातून ८५ तोळे सोन्याचे दागिने आणि ९५ हजार रुपयांच्या रोकडसह सुमारे १ कोटी १६ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सांगली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी जप्त केली. लाच घेताना सोमवारी रंगेहाथ अटक केलेल्या जावेद इनामदार १0 दिवसांसाठी पोलीस कोठडीत आहे. अकोला जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शमशोद्दीन इनामदार याने तेल्हारा पंचायत समितीच्या दोन कर्मचार्‍यांचे गृहकर्ज मंजूर करण्यासाठी त्यांना २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १५ हजार रुपये त्याने आधीच स्वीकारले होते. उर्वरित १0 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी सोमवारी रंगेहाथ अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान त्याची चौकशी सुरू असून, त्याने बुधवारी दिलेल्या माहितीच्या आधारे सांगलीतील निवासस्थानातून ८५ तोळे सोन्याचे दागिने, ५ खोल्यांचा फ्लॅट, ९५ हजार रुपये रोख, घरातील महागडे फर्निचर आणि इतर साहित्य मिळून १ कोटी १६ लाख ८२ हजार १७0 रुपये सांगली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जप्त केले. यासोबतच त्याचे मोठय़ा प्रमाणात ह्यफिक्स डिपॉझिटह्ण असल्याचेही आढळून आले. असून, ही रक्कम नेमकी किती आहे, याचा शोध सांगली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी घेत आहेत. इनामदार ३0 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत असून, या काळात त्याच्या सर्व बेहिशेबी संपत्तीचा खुलासा होणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

Web Title: Unaccounted amount of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.