अनधिकृत बांधकाम ताेडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:43+5:302021-07-14T04:21:43+5:30
४३२ जणांचे घेतले नमुने अकाेला : मागील काही दिवसांपासून संसर्गजन्य काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समाेर आले आहे. तरीही, ...
४३२ जणांचे घेतले नमुने
अकाेला : मागील काही दिवसांपासून संसर्गजन्य काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे समाेर आले आहे. तरीही, काेराेनासदृश लक्षणे आढळून येत असल्यामुळे नागरिक काेराेनाची चाचणी करीत आहेत. साेमवारी ४३२ जणांनी नाकातील स्रावाचे नमुने दिले. यामध्ये ४१ जणांनी आरटीपीसीआर तसेच ३९१ जणांनी रॅपिड ॲंटिजेन चाचणी केली. संबंधितांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले.
काेराेना रुग्णाचा आलेख शून्यावर
अकाेला : संसर्गजन्य काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना जीव गमवावा लागला. फेब्रुवारी ते मे महिन्याच्या मध्यावधीपर्यंत काेराेनाची दुसरी लाट हाेती. जून महिन्यापासून काेराेनाबाधित रुग्णांचा आलेख कमी झाला आहे. साेमवारी मनपाला जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार शहरात एकही काेराेना रुग्ण आढळून आला नाही. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बेफिकिरी नकाे; नियमांचे पालन करा!
अकाेला : काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घसरण झाली आहे. दरम्यान, बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. काेराेनाचा संसर्ग अद्यापही कायम असताना नागरिक साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी हलगर्जी न करता नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
‘मंदिरात दर्शनाची परवानगी द्या!’
अकाेला : आषाढी एकादशीनिमित्त शासनाने वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे शक्य हाेणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जुने शहरातील प्राचीन विठ्ठलरुक्माई मंदिरात काेराेनाच्या नियमांचे पालन करून
दर्शनाची परवानगी देण्याची मागणी भाजपचे आमदार गाेवर्धन शर्मा यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केली आहे.
‘अस्वच्छतेची समस्या निकाली काढा!’
अकाेला : मान्सूनपूर्व नालेसफाईचा फज्जा उडाला असून मनपाच्या स्वच्छता व आराेग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे नाले, गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. पावसाच्या पाण्यामुळे नाल्यांमधील घाण सांडपाणी मुख्य रस्त्यांमध्ये साचत असून सखल भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त नीमा अराेरा यांच्याकडे केली आहे.