अकोला जिल्हय़ातील ३0 माध्यमिक शाळा ‘सरल’बाबत अनभिज्ञ

By admin | Published: May 23, 2016 01:47 AM2016-05-23T01:47:00+5:302016-05-23T01:47:00+5:30

ऑनलाइन माहितीसाठी ३0 मेपर्यंत मुदत.

Unaware of 'simple' 30 secondary schools in Akola district | अकोला जिल्हय़ातील ३0 माध्यमिक शाळा ‘सरल’बाबत अनभिज्ञ

अकोला जिल्हय़ातील ३0 माध्यमिक शाळा ‘सरल’बाबत अनभिज्ञ

Next

अकोला: जिल्ह्यातील ४४९ माध्यमिक शाळांपैकी ३0 शाळांनी अजूनही ह्यसरलह्ण प्रणाली द्वारे ऑनलाइन माहिती भरली नसल्याची माहिती समोर आली आहे. या शाळांनी ह्यसरलह्ण प्रणालीमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शाळेची माहिती न भरल्यास त्यांना शासनाकडून मिळणार्‍या सोयी सुविधा बंद होऊ शकतात, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. ह्यसरलह्णमध्ये विद्यार्थी व शाळेची सर्व माहिती ऑनलाइन भरावयाची आहे. संबंधित शाळेमध्ये किती विद्यार्थी संख्या आहे, किती शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. विद्यार्थ्याच्या ऑनलाइन माहितीमध्ये त्याचे नाव, पालकाचे नाव, संबंधित विद्यार्थ्याचा आधार क्रमांक, जन्मतारीख अशा १0 ते १२ घटकांमध्ये ही माहिती भरावयाची आहे. यापूर्वी तीन-चार वेळा ही माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. काही शाळांनी रात्र-रात्र जागून ही माहिती पूर्ण केली. अगदी दुर्गम भागातील शाळांचीही माहिती भरून घेण्यात आली. आता राहिलेल्या शाळांची माहिती भरल्यास जिल्ह्याचे सरल प्रणालीचे काम १00 टक्के पूर्ण होणार आहे. राज्यातील सर्व शाळांची ह्यसरलह्णची माहिती ऑनलाइन पूर्ण करण्याची प्रत्येक जिल्ह्याला मुदत देण्यात येत आहे. एकाच वेळी सर्व जिल्ह्यांची माहिती भरण्यास सुरुवात केल्यास सर्व्हर हँग होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला राज्य स्तरावरून वेगवेगळ्या तारखा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाशी संपर्क साधून अपूर्ण माहिती पूर्ण करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हय़ातील ४४९ माध्यमिक शाळांपैकी ३0 शाळांनी सरल डाटाबेसवर माहिती भरलेली नाही. या शाळांनी येत्या ३0 मेपर्यंत माहिती भरावी अन्यथा त्यांना मिळणार्‍या सोयीसवलती बंद होऊ शकतात, असे सांगण्यात आले.

Web Title: Unaware of 'simple' 30 secondary schools in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.