फुटबॉलसाठी आज अशैक्षणिक दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:28 AM2017-09-15T01:28:51+5:302017-09-15T01:29:20+5:30

फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) च्यावतीने भारतात १७ वर्षाआतील मुलांसाठी फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामधील सहा सामने नवी मुंबई येथे होणार आहेत. यासाठी राज्यात फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार होऊन मुलांमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी, याकरिता महाराष्ट्र मिशन वन मिलियन फुटबॉल हा कार्यक्रम शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. १५ सप्टेंबर हा अशैक्षणिक दिवस शासनाने घोषित केला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये शुक्रवारी संपूर्ण दिवस फुटबॉल खेळाचे आयोजन केले आहे.

Uncanny day for football today | फुटबॉलसाठी आज अशैक्षणिक दिवस

फुटबॉलसाठी आज अशैक्षणिक दिवस

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाभरात खेळणार २५ हजार विद्यार्थी!सर्व शाळांमध्ये शुक्रवारी संपूर्ण दिवस फुटबॉल खेळाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) च्यावतीने भारतात १७ वर्षाआतील मुलांसाठी फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामधील सहा सामने नवी मुंबई येथे होणार आहेत. यासाठी राज्यात फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार होऊन मुलांमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी, याकरिता महाराष्ट्र मिशन वन मिलियन फुटबॉल हा कार्यक्रम शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. १५ सप्टेंबर हा अशैक्षणिक दिवस शासनाने घोषित केला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये शुक्रवारी संपूर्ण दिवस फुटबॉल खेळाचे आयोजन केले आहे.
शासनाने अशैक्षणिक दिवस घोषित केला असल्याने सर्व शाळांमध्ये शुक्रवारी विद्यार्थी फक्त फुटबॉल खेळणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी शाळेमध्ये मान्यवर खेळाडू, पदाधिकारी यांना सामन्यांच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करावे. सकाळी शाळेमधील किती मुले-मुली फुटबॉल खेळत आहेत. तसेच सामन्यांची संख्या किती व प्रेक्षक संख्या किती याची माहिती व्हॉटस अँपवर फोटोसह पाठवावी. यामध्ये दिरंगाई करणार्‍यांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असे फर्मानच शिक्षण विभागाने काढले आहे. दरम्यान, शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी फुटबॉल फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. यामध्ये जिल्हाभरातील २५ हजार विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. जिल्हय़ातील ४९६ शाळा या उपक्रमात सहभागी होत आहेत. याकरिता ऑनलाइन नोंदणी केलेल्या ४६0 शाळांना प्रत्येकी तीन फुटबॉल व नोंदणी न केलेल्या शाळांना दोन फुटबॉल नियोजन सभेत देण्यात आले. शाळा स्तर व महाविद्यालय स्तरावर प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय वसंत देसाई क्रीडांगण व लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे दोन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक सेल्फी पॉइंट असणार आहे. मुख्य क ार्यक्रम १५ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे महाराष्ट्र मिशन फुटबॉल वन मिलियनचे प्रदर्शनी सामन्यांचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली.

Web Title: Uncanny day for football today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.