महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी; अभाविपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 11:06 AM2020-11-08T11:06:42+5:302020-11-08T11:07:03+5:30
Protest of ABVP In Akola सिव्हिल लाइन चौकात अभाविपने शासनाच्या विरोधात निदर्शने केली.
अकाेला: जी परिस्थिती आणीबाणीच्या काळात होती, तीच परिस्थिती आज महाराष्ट्रात पाहावयास मिळ्त आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधात जर कोणी बोलले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे, असा आराेप करून स्थानिक सिव्हिल लाइन चौकात अभाविपने शासनाच्या विरोधात निदर्शने केली.
अर्णव गोस्वामी यांना दडपशाहीच्या मार्गाने अटक करण्यात आली असून, हा प्रकार व्यक्तिस्वातंत्र्याची व प्रसारमाध्यमांची गळचेपी करणारा असल्याचाही आराेप अकोला महानगर मंत्री अभिषेक देवर यांनी केला. यावेळी महानगर सहमंत्री गुलशन एन. तिवारी, विराज वानखडे, आदित्य केंदळे, कार्यालय व कोष प्रमुख देवाशीष गोतरकर, प्रतीक देवतळे, अनिकेत पजई, आदित्य पवार, जयकुमार आडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.