अकोल्यात पाच लाखांचा गुटखा जप्त; गुटखा माफियांविरुद्ध कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:12 AM2018-04-06T01:12:42+5:302018-04-06T01:12:42+5:30
अकोला : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची पोलिसांच्याच आशीर्वादाने शहरासह जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. राधाकृष्ण टॉकीजसमोर मूर्तिजापूरवरून येत असलेला तब्बल चार लाख रुपयांचा गुटख्याचा साठा वाहतूक पोलिसांनी गुरुवारी दुपारी जप्त केला. या प्रकरणात खदान पोलीस ठाण्यात गुटखा माफियांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची पोलिसांच्याच आशीर्वादाने शहरासह जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. राधाकृष्ण टॉकीजसमोर मूर्तिजापूरवरून येत असलेला तब्बल चार लाख रुपयांचा गुटख्याचा साठा वाहतूक पोलिसांनी गुरुवारी दुपारी जप्त केला. या प्रकरणात खदान पोलीस ठाण्यात गुटखा माफियांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू होती.
मूर्तिजापूर येथील बडा गुटखा माफिया अग्रवाल याच्याकडून रजपूतपुर्या तील रहिवासी नरेंद्र चमनलाल अग्रवाल व संतोष अशोकसिंग ठाकू र या दोघांनी तब्बल तीन लाख रुपयांचा गुटखा खरेदी करून तो ओमनी कारमध्ये भरला. त्यानंतर एमएच ३0 एल २८४४ या क्रमांकाची ओमनी कार गुटख्याचा साठा घेऊन येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांना मिळताच त्यांनी कर्मचार्यांना ओमनी कारच्या पाळ तीवर ठेवले. कार राधाकृष्ण टॉकीजसमोर येताच वाहतूक पोलिसांनी अडविली. त्यानंतर कारची झडती घेतली असता यामध्ये गुटख्याचा साठा आढळला. यामध्ये विमल गुटख्याचे १0 पोते, काली पान बहार गुटख्याचे दहा पोते, तंबाखू १0 पोते अशाप्रकारे तीन लाख रुपयांचा गुटखा व ओमनी कार असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यापूर्वी चार वेळा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गुटखा साठा व देशी व विदेशी दारू जप्त केलेली आहे.
ई-वे बिलिंगला दे धक्का
शहरासह जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात गुटख्याचा साठा आणण्यात येत आहे. प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा आणताना ई-वे बिलिंगला दे धक्का देण्यात येत आहे. ई-वे बिलिंग न घेताच गुटख्याची मोठय़ा प्रमाणात खरेदी- विक्री होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा कर चोरी करण्यात येत आहे. त्यामुळे सदर गुटखा प्रकरणात जीएसटी कार्यालयाने ई-वे बिलिंगसंदर्भात कारवाई करणे अपेक्षित आहे.
‘विमल’चा सौदागर ‘दिलीप’
विमल गुटख्याची निर्मिती करणार्या कंपनीसोबत अकोल्यातील दिलीप नामक व्यक्तीचे थेट संबंध असल्याचे आता उघड झाले आहे. लाखो रु पयांचा कर चोरी करून हा गुटखा अकोल्यात आणण्याचे काम दिलीपचेच असून, रोज एक मोठा ट्रक अकोल्यात उतरविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र याकडे जीएसटी कार्यालयाने अद्यापही लक्ष दिले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.