रस्त्याच्या खोदकामात तुटली भूमिगत वीज वाहिनी

By admin | Published: May 22, 2017 01:05 AM2017-05-22T01:05:57+5:302017-05-22T01:05:57+5:30

कलेक्टर आॅफिस फिडर प्रभावित : चित्रा फिडरवरून ‘बॅकफिडिंग’

The underground electricity corridor collapsed in the excavation of the road | रस्त्याच्या खोदकामात तुटली भूमिगत वीज वाहिनी

रस्त्याच्या खोदकामात तुटली भूमिगत वीज वाहिनी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील टिळक मार्गावर सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान महापारेषणच्या आपातापा येथील १३२ बाय ३३ केव्ही उपकेंद्रातून महावितरणच्या कलेक्टर आॅफिस फिडरपर्यंत जाणारी भूमिगत विद्युत वाहिनी तुटल्यामुळे कलेक्टर आॅफिस फिडरचा विद्युत पुरवठा प्रभावित झाला आहे. महावितरणने चित्रा फिडरवरून तातडीने वीजपुरवठा वळता केल्याने कलेक्टर आॅफिस फिडरवरील नागरिकांचा वीजपुरवठा अबाधित ठेवला.
शहरात रस्त्यांची कामे झपाट्याने सुरू आहेत. आठ सिमेंट रस्त्यांपैकी टिळक मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सिटी कोतवाली ते जुना कपडा बाजारपर्यंतच्या रस्त्याचे खोदकाम करून त्यामध्ये मुरूम टाकून दबाई करण्याचे काम सुरू आहे. या मार्गाखालून महापारेषणच्या आपातापा केंद्रातून महावितरणच्या कलेक्टर आॅफिस फिडरपर्यंत जाणारी उच्चदाब वाहिनी टाकलेली आहे. या खोदकामादरम्यान गत तीन दिवसांपूर्वी मनुबाई कन्या शाळा आणि भंगार बाजारजवळ जेसीबीमुळे ही विद्युत वाहिनी तुटली. काम सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आधीच या वाहिनीचा वीजपुरवठा खंडित केलेला होता.
दरम्यान, कलेक्टर आॅफिस फिडरचा वीजपुरवठा बंद असल्याने या फिडरवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये चित्रा फिडरवरून वीजपुरवठा वळता करण्यात आला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास अवगत केले असून, येत्या दोन दिवसांत विद्युत वाहिनी दुरुस्तीची कामे पूर्ण होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: The underground electricity corridor collapsed in the excavation of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.