नकोशी झाली ‘आनंदी!’
By admin | Published: March 9, 2017 03:21 AM2017-03-09T03:21:38+5:302017-03-09T03:21:38+5:30
पातूर येथे महिला दिनानिमित्त नामकरण सोहळा संपन्न झाला.
पातूर(जि. अकोला), दि. ८- मुलगा होईल, या आशेने वाट पाहताना मुलगीच झाली आणि नको असलेल्या मुलीचे नकोशी असे नामकरण करण्यात आले. या नकोशीच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम जागतिक महिला दिनानिमित्त झाले. पातूरच्या किड्स पॅराडाइजने ८ मार्च रोजी या नकोशीचा नामकरण सोहळा घेऊन तिचे नाव आनंदी ठेवले व तिच्या शिक्षणाचा भार उचलून तिच्या जीवनात आनंद फुलविला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी पातूरच्या किड्स पॅराडाइज पब्लिक स्कूलमध्ये महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी शाळेच्या संचालिका ज्योत्स्ना गाडगे व संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी आनंदीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा संकल्प केला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मीरा तायडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रभा कोथळकर, बांधकाम सभापती वर्षा बगाडे, नगरसेविका संध्या जोशी, प्रा. डॉ. ममता इंगोले, तुळसाबाई गाडगे, सरपंच रिना सिरसाट, सत्कारमूर्ती मैनाबाई बोंबटकार, कांचन पुराड, वैशाली कुटे, जिजाबाई शेवलकार, सरस्वताबाई राखोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ह्यजागर महानायिकांचाह्ण हा नाट्यप्रयोग विद्यार्थ्यांंंनी सादर केला. या नाटिकेनंतर पहिल्या नगरसेविका मैनाबाई बोंबटकार, उद्योजक कांचन पुराड, संघर्षशील महिला सरस्वताबाई राखोंडे, वैशाली कुठे, जिजाबाई शेवलकार आदी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर प्रा. डॉ. ममता इंगोले व मीरा तायडे यांनी मनोगत व्यक्त केले.