गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले; पोलीस ठाण्यात गुन्हा

By नितिन गव्हाळे | Published: November 1, 2023 07:08 PM2023-11-01T19:08:22+5:302023-11-01T19:08:26+5:30

एकूण एक लाख २१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सकाळी त्यांची पत्नी उठल्यावर तिला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Unidentified thieves broke into a house in Akola and stole gold ornaments worth Rs 1 lakh | गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले; पोलीस ठाण्यात गुन्हा

गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले; पोलीस ठाण्यात गुन्हा

अकोला : जुने शहरात गाडगे नगरात २८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील एक लाख २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गाडगे नगरात राहणारे मिर्झा जहीर बैग हफीजउल्लाह बेग (वय ५५) यांच्या तक्रारीनुसार २८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते पत्नीसह झोपलेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले १८ ग्रॅमची तांदूळपोथ, १० ग्रॅमचा सेव्हनपीस हार, १० ग्रॅमचे टॉप्स, ५ ग्रॅमचे कानातील झुमके, २ ग्रॅमचे सोन्याचा कैट, चांदीच्या तोरड्या, चेनपट्टी, चांदीच्या अंगठ्या असे एकूण एक लाख २१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सकाळी त्यांची पत्नी उठल्यावर तिला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गीता नगरातील डुप्लेक्स फोडले
गीता नगरात डुप्लेक्समध्ये राहणारे शासकीय कंत्राटदार विजय भरत उगले (वय ४०) यांच्या तक्रारीनुसार २४ ऑक्टोबर रोजी दसरा सणानिमित्त ते सिरसोली येथे गेले होते. दरम्यान, घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करून चांदीच्या भांड्यासह १५ ग्रॅमची सोन्याची पोथ असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. २८ ऑक्टोबर रोजी ते घरी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Unidentified thieves broke into a house in Akola and stole gold ornaments worth Rs 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.