केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी अकाेल्यात; सहा लाेकसभा मतदार संघांचा घेणार आढावा
By आशीष गावंडे | Published: March 1, 2024 11:07 PM2024-03-01T23:07:37+5:302024-03-01T23:08:21+5:30
शाह यांचे ५ मार्चला सकाळी १०.३० वाजता अकाेला शहरात आगमन हाेणार असल्याची माहिती
आशिष गावंडे, अकाेला: आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने संचलन समिती गठीत केली आहे. या समितीकडून लाेकसभा मतदार संघ निहाय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ५ मार्च मंगळवार राेजी सकाळी १०.३० वाजता अकाेला शहरात आगमन हाेत आहे.
लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने राज्यात पाच लाेकसभा मतदार संघ मिळून एक ‘क्लस्टर’तयार केले आहे. निवडणुकीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीच्या निर्देशानुसार संचलन समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले पक्षातील मुख्य पदाधिकारी, विविध आघाडी व सेलच्या प्रमुखांना कामाच्या स्वरुपानुसार जबाबदारी देण्यात आली आहे. लाेकसभा मतदार संघातील राजकीय समिकरणांचा आढावा घेऊन रणनिती आखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ मार्च राेजी अकाेल्यात दाखल हाेत आहेत. रिधाेरा नजिक असलेल्या एका प्रशस्त हाॅटेलमध्ये ते आढावा घेतील. दुपारी १.०० वाजता बैठक आटाेपून ते जळगावकडे रवाना हाेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.