केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी महापालिकेचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 18:07 IST2020-04-13T18:06:55+5:302020-04-13T18:07:10+5:30

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिक प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

Union Minister of State for Sanjay Dhotre reviews municipal corporation Akola | केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी महापालिकेचा घेतला आढावा

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी महापालिकेचा घेतला आढावा

अकोला : महापालिका क्षेत्रात जीवघेण्या कोरोना विषाणूचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्या पृष्ठभूमीवर सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी महापालिका प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी स्थायी समितीच्या सभागृहामध्ये नामदार धोत्रे यांनी अकोलेकरांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिक प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. आढावा बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, मनपा आयुक्­त संजय कापडणीस, स्­थायी समिती सभापती सतीश ढगे, माजी नगरसेवक जयंत मसने यांची प्रामुख्­याने उपस्थिती होती. अकोल्यातील प्रभाग क्रमांक २ मधील अकोट फैल आणि प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा भागामध्­ये कोरोना संक्रमित रुग्­ण आढळल्­याने सील केलेल्­या परिसरातील तसेच कोरोना संक्रमित रुग्­णांच्­या संपर्कात आलेल्­या नागरिकांच्या आरोग्­य तपासणी बाबत ना. संजय धोत्रे यांनी विचारणा केली. या भागात कोरोनाचा धोका वाढू नये यासंदर्भात मनपा प्रशासनाद्वारे करण्­यात आलेल्या उपाययोजनांचा संपूर्ण आढावा घेतला.

Web Title: Union Minister of State for Sanjay Dhotre reviews municipal corporation Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.