युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पाळला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:26 PM2020-02-01T12:26:09+5:302020-02-01T12:26:42+5:30
नवीन पेन्शन योजना बंद करणे, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास निश्चित करणे, ५ दिवसांचा आठवडा लागू करणे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.
अकोला : युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने शुक्रवारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी नारेबाजी करीत गांधी मार्गावरील महाराष्ट्र बँकेसमोर धरणे दिले. नवीन पेन्शन योजना बंद करणे, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास निश्चित करणे, ५ दिवसांचा आठवडा लागू करणे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स (एआबीईए-एनसीबीई-आयबीक-एआयबीओए-बेफी-ईन्वीक-ईन्वेफ-एनओबीडब्ल्यू-नीबी) शंभर बँक कर्मचारी तसेच अधिकारी म्हणजे १० लाख बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाºया फोरमच्या वतीने ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय देशव्यापी आंदोलन पुकारले. या आंदोलनास प्रतिसाद देत अकोल्यातील बँक अधिकारी, कर्मचाºयांनी गांधी मार्गावर निदर्शने केलीत. सकाळी ११ वाजतापासून तर दुपारी ३ वाजतापर्यंत हे आंदोलन चालले. श्याम माईदकर, दीपक पिटके, प्रकाश दाते, गजानन पवार यांच्या नेतृत्वात अकोल्यात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतलेत. दोन दिवसीय आंदोलनात अकोल्यातील राष्ट्रीयीकृत सर्व बँका सहभागी असतील, अशी माहितीदेखील येथे देण्यात आली.