विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा प्रचार जोमात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:14 AM2017-10-04T02:14:55+5:302017-10-04T02:15:01+5:30
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांमध्ये एकूण २0५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीपूर्वीच ७७ उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. उर्वरित उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू असून, उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर देत आहेत. अकोला जिल्हय़ातून तब्बल ३५ उमेदवार विविध मतदारसंघांतून एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.
नितीन गव्हाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांमध्ये एकूण २0५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीपूर्वीच ७७ उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. उर्वरित उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू असून, उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर देत आहेत. अकोला जिल्हय़ातून तब्बल ३५ उमेदवार विविध मतदारसंघांतून एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.
सिनेट, विद्वत, अभ्यास मंडळ आदी प्राधिकारिणीवर प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी प्राचार्य मतदारसंघ, महिला व्यवस्थापन मतदारसंघ, महिला प्रवर्ग, संस्था प्रतिनिधी, विद्यापीठ शिक्षक गट, पदवीधर मतदारसंघासोबतच कला, वाणिज्य, विज्ञान विभाग, मराठी, इंग्रजी, हिंदी, संगीत, सामाजिकशास्त्र, शारीरिक शिक्षण आदी मतदारसंघामध्ये उमेदवार उभे ठाकले आहेत. १५ ऑक्टोबर रोजी ६७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला असून, विद्यापीठातील समस्या, मार्गी लावण्याचे आश्वासन उमेदवारांकडून दिली जात आहेत. जवळपास १६ हजारांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
त्यासाठी उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर देत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. यासोबतच व्हॉट्स अँप, फेसबुकच्या माध्यमातूनही उमेदवार प्रचार करीत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्राधिकारिणी निवडणुकीत यापूर्वीच तब्बल ७७ उमेदवारांची अभ्यास मंडळ, विद्वत परिषदेवर दोन आणि एकाची सिनेटवर अविरोध निवड झाली आहे. आता २0५ उमेदवारांमध्ये विविध मतदारसंघांमध्ये थेट लढत होणार आहे.
अकोला जिल्हय़ातून विविध गटांत ३५ जण रिंगणात
प्राचार्य, विद्यापीठ शिक्षक, पदवीधर, शिक्षक प्रतिनिधी, संगीत, यासह इतर गटातून डॉ. श्रीप्रभू चापके, डॉ. मधुकर पवार, डॉ. अंबादास कुलट, डॉ. जगदीश साबू, डॉ. संतोष ठाकरे, संस्था प्रतिनिधी गटातून तुळशीदास मिरगे, डॉ. ज्ञानदेव इंगळे, डॉ. ममता इंगोले, प्रा. विवेक हिवरे, रवींद्र मुंडरे, डॉ. डी.ई. उंबरकर, अनिता काळमेघ, प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, संजय देशमुख, उमेश कुळमेथे, समीर गडकरी, गजानन मानकर, रवींद्र तायडे, प्रदीप थोरात, अनिता चोरे, विवेक बोचे, श्रीकांत सातारकर, डॉ. मुकुंद इंगळे, डॉ. राजकुमार राठोड, श्रीकृष्ण काकडे, संतोष ठाकरे, डॉ. किरण खंडारे, डॉ. किसन मेहरे, भास्कर पाटील, मो. अमजद काझी, डॉ. किशोर देशमुख, डॉ. प्रशांत कोथे, डॉ. आनंद काळे, डॉ. बंडू किर्दक, संध्या काळे आदी उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.