अज्ञाताने स्प्रिंकलर पाइप जाळले, ४० हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:15 AM2021-05-31T04:15:16+5:302021-05-31T04:15:16+5:30

खेट्री: पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असेलल्या चतारी शिवारात शेतात ठेवलेले स्प्रिंक्लर पाइप अज्ञात व्यक्तीने जाळल्याने शेतकऱ्याचे ४० ...

Unknown burnt sprinkler pipe, loss of Rs 40,000 | अज्ञाताने स्प्रिंकलर पाइप जाळले, ४० हजारांचे नुकसान

अज्ञाताने स्प्रिंकलर पाइप जाळले, ४० हजारांचे नुकसान

Next

खेट्री: पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असेलल्या चतारी शिवारात शेतात ठेवलेले स्प्रिंक्लर पाइप अज्ञात व्यक्तीने जाळल्याने शेतकऱ्याचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना दि. ३० मे रोजीच्या सकाळी उघडकीस आली. या प्रकरणात शेतकऱ्याने चान्नी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, चतारी येथील श्रीकृष्ण मनोहर लखाडे यांनी पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंक्लर पाइप खरेदी करून आणले होते. दि. २९ मे रोजीच्या रात्री अज्ञात व्यक्तीने जाळल्यामुळे शेतकरी श्रीकृष्ण लखाडे यांचा ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी श्रीकृष्ण लखाडे यांनी थेट चान्नी पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दिली. यावरून चान्नी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशनचे सहायक उपनिरीक्षक आदिनाथ गाठेकर करीत आहेत. यापूर्वीही खेट्री टाकळी शेतशिवारातून जवळपास २२ शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे दोन हजार सर्व्हिस वायर अज्ञात चोरणारी टोळीने लंपास केल्याची घटना घडली होती. या परिसरात चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांचे शेती साहित्य चोरणारी टोळीला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Unknown burnt sprinkler pipe, loss of Rs 40,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.