अंबासी येथे शेळ्यांना अज्ञात तापाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:20 AM2021-05-06T04:20:12+5:302021-05-06T04:20:12+5:30
गत महिन्यात देऊळगाव येथे गायी व व गुराढोरांना अज्ञात रोगाची लागण झाली होती. अनेक गुरे पायखुरी व तोंडखुरीने त्रस्त ...
गत महिन्यात देऊळगाव येथे गायी व व गुराढोरांना अज्ञात रोगाची लागण झाली होती. अनेक गुरे पायखुरी व तोंडखुरीने त्रस्त झाली होती. मात्र, शासनाच्या गुरांच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची दखल घेतली नाही. त्यामुळे अनेक पशुपालकांना स्वतःच्या पैशातून हजारो रुपये गमावून स्वतःच्या गुरांवर उपचार करावे लागत आहेत. गावात अद्यापही आजाराची साथ सुरू आहे. परंतु, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. अंबाशी या गावामध्ये शेळ्यांना अज्ञात तापाची लागण झाली आहे. आजार वाढत असून अंबाशी येथे चार-पाच बकऱ्या दगावल्या आहेत. असे असताना या गावामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी आले नाहीत आणि कुठल्याही प्रकारचे लसीकरण गावामध्ये करण्यात आले नाही. त्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत.
माझ्याकडे ४० ते ५० बकऱ्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून गावामध्ये बकऱ्यांना अज्ञात तापाची लागण झाली आहे. चार ते पाच बकऱ्या उपचाराअभावी मरण पावल्या. बकऱ्यांचा मृत्यू होत आहे. गावात पशुवैद्यकीय अधिकारी येत नाहीत. तालुक्याला पशुवैद्यकीय अधिकारी देण्यात यावा.
-मोहम्मद युनुस मुराद पटेल, पशुपालक अंबाशी