फौजदारी कारवाई झालेल्या तलाठ्यांना नियमबाह्य पदस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 02:03 PM2020-03-04T14:03:14+5:302020-03-04T14:03:23+5:30

मंगरुळपीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा तलाठी पदावर पदस्थापना देण्याचे आदेश काढले आहेत.

Unlawful deportation of talathi in Washim | फौजदारी कारवाई झालेल्या तलाठ्यांना नियमबाह्य पदस्थापना

फौजदारी कारवाई झालेल्या तलाठ्यांना नियमबाह्य पदस्थापना

Next

- दादाराव गायकवाड 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मानोरा तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत तलाठ्यांवरील फौजदार प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल अप्राप्त असतानाही कारंजा उपविभागाचा प्रभार सांभाळत असलेल्या मंगरुळपीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा तलाठी पदावर पदस्थापना देण्याचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, श्रेणी ३ च्या तलाठ्यांची बदली करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच असताना त्यांनी ही प्रक्रिया पार पाडत, जिल्हाधिकाºयांच्या अधिकारावर अतिक्रमणच केल्याचे स्पष्ट होत आहे.
प्राप्त माहितीनुसार कारंजा उपविभागांतर्गत विविध ठिकाणी कार्यरत चार तलाठ्यांना २००९ ते २०१४ या कालावधीत फौजदारी प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. त्यात दिलिप अंगाईतकर, निलेश कांबळे, व्ही.एम. भोयर आणि एस. डी. महाजन यांचा समावेश होता. दिलिप अंगाईतकर, यांच्यावरील खटल्याचा २९ जुलै २०१६ रोजी निकाल लागला, तर निलेश कांबळे यांच्यावरील खटल्याचाही निकाल लागला. हे चारही तलाठी सध्या कारंजा येथील तहसील कार्यालयात अकार्यकारी पदावर कार्यरत आहेत. तथापि, व्ही.एम. भोयर आणि एस. डी. महाजन यांच्यावरील खटल्याचा चौकशी अहवाल २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत अप्राप्त असून, शासनाच्या १४ आॅक्टोबर २०११ च्या निर्णयातील परिच्छेद ५ नुसार फौजदारी कारवाई झालेल्या तलाठ्यांना (शासकीय कर्मचारी) संबंधित प्रकरणाचा खटला, अपिल, विभागीय चौकशीचा निकाल लागेपर्यंत अकार्यकारी व जनसंपर्क येणार नाही, अशाच पदावर पदस्थापना देण्याची खबरदारी ठेवणे आवश्यक आहे; परंतु कारंजा उपविभागाचा प्रभार सांभाळत असलेल्या मंगरुळपीर उपविभागीय अधिकाºयांनी या तलाठ्यांना २७ फेब्रुवारी रोजी तलाठी पदावर पदस्थापना देण्याचे आदेश पारित केले. विशेष म्हणजे ज्या तालुक्यात कार्यरत असताना या तलाठ्यांवर फौजदारी प्रकरणात निलंबनाची कारवाई झाली.
त्याच तालुक्यात व्ही. एम. भोयर आणि एस. डी. महाजन यांना पदस्थापना दिली आहे. त्यातच वर्ग ३ मध्ये मोडणाºया कर्मचाºयांच्या बदलीचे अधिकार उपविभागीय अधिकाºयांना नसल्याचा निर्वाळा ‘मॅट’ने काही महिन्यांपूर्वी दिला असतानाही प्रभारी उपविभागीय अधिकाºयांनी या तलाठ्यांना पदस्थापना देत जिल्हाधिकाºयांच्या अधिकारांवर अतिक्रमण केले.


या प्रकरणाची विस्तृत माहिती नाही. त्यामुळे सर्व प्रकरणाची शहानिशा करून झालेली प्रक्रिया चुकीची असेल, तर ती रद्द करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम


तलाठ्यांची नियुक्ती, बदलीबाबत नियुक्ती प्राधिकारी म्हणून आम्हाला अधिकारी आहेत, शिवाय पदस्थापना देताना नियमांचे उल्लंघनही करण्यात आले नाही. -जयवंत देशपांडे,
प्रभारी उपविभागीय अधिकारी, कारंजा

Web Title: Unlawful deportation of talathi in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम