विनापरवाना इंधन विक्री केंद्र होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:24 AM2021-08-25T04:24:24+5:302021-08-25T04:24:24+5:30
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, जैविक इंधन व औद्योगिक तेल विक्रीची जवळपास २२ विक्री केंद्रे उभारण्यात आली असून, ...
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, जैविक इंधन व औद्योगिक तेल विक्रीची जवळपास २२ विक्री केंद्रे उभारण्यात आली असून, या केंद्रांकडून अवैधरीत्या जैविक इंधन व औद्योगिक तेल विक्री केली जात आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात विनापरवाना सुरू करण्यात आलेली अवैध जैविक इंधन आणि औद्योगिक तेल विक्री केंद्रे बंद करण्याची कार्यवाही लवकरच संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात येणार आहे.
बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी
केंद्र शासनाच्या निर्देश व नियमांनुसार इंडस्ट्रीयल ऑइल विक्री केंद्र सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज नाही. त्यामुळे विक्री केंद्रांसाठी परवानगी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
ज्ञानेश्वर पाटील
व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ मर्चंट ॲन्ड ट्रेडिंग कंपनी.
केंद्र शासनाच्या अध्यादेशानुसार इंडस्ट्रीयल ऑइल विक्री केंद्र सुरू केले असून, नियमानुसार इंडस्ट्रीयल ऑइलची विक्री केली जात आहे.
राजेश मते
विक्रेता, इंडस्ट्रीयल ऑइल, अकोला.