जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:14 AM2021-06-06T04:14:56+5:302021-06-06T04:14:56+5:30
कोविडच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा माेठ्या प्रमाणात प्रभावित झाला. एप्रिल, मे महिन्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर झाल्याचे दिसून आले. मात्र, मे ...
कोविडच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा माेठ्या प्रमाणात प्रभावित झाला. एप्रिल, मे महिन्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर झाल्याचे दिसून आले. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्या वाढीचा वेग कमालीचा कमी झाला. रुग्णालयात दाखल ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही लक्षणीय घटल्याने, ५० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन खाटा रिक्त झाल्या. दरम्यान, शासनाने पाच टप्प्यांत अनलॉकचे नियोजन केले. त्यासाठी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन खाटांचे निकष लावण्यात आले. या निकषानुसार, अकोला जिल्हा तिसऱ्या टप्प्यात मोडत असून, सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉकला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अकोलेकरांना विशेषत: व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या प्रतिष्ठानांसोबतच इतरही प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजतापर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी मिळणार आहे, तसेच वीकेंडला औषधांच्या प्रतिष्ठाने वगळून उर्वरित संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.
जिल्ह्याचा सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट - ७.२४
सध्या ऑक्सिजन खाटांवर असलेले रुग्ण ७६८ (४४.६७)
एकूण पॉझिटिव्ह - ५६,५११
एकूण मृत्यू - १,१०१
डिस्चार्ज - ५२,३७४
ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण - ३,०३६
काय सुरू राहील
अत्यावश्यक दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. त्यानंतर, घरपोच सेवा सुरू राहील.
जीम, सलून, ब्यूटी पार्लर ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. एसी बंद ठेवूनच चालू राहतील.
सार्वजनिक मैदाने, आउटडोर गेम्ससाठी दरदिवशी ५ ते ९ वाजेपर्यंत परवानगी.
खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीत दुपारी ४ वाजतापर्यंत चालू राहतील.
अंत्ययात्रेस २० जणांची उपस्थिती असेल.
सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ ५० टक्के उपस्थितीत केवळ सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत करता येतील.
स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत करता येतील.
सार्वजनिक प्रवास, आंतरजिल्हा प्रवास या गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
हे बंद राहील
मॉल, थिएटर्स, नाट्यगृह बंद राहतील.
वीकेंडला संपूर्ण बाजारपेठ बंद राहील.
अकोला जिल्हा तिसऱ्या टप्प्यात मोडताे. त्यानुसार, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आदेश पारीत केला आहे. त्याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे.
- प्रा.संजय खडसे