अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:19 PM2019-09-04T14:19:06+5:302019-09-04T14:19:13+5:30

बॅगची तपासणी केली असता यामध्ये धोकादायक असे काहीही न आढळल्याने प्रवाशांसह अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

unmanageable bag was found in Ahmedabad-Howrah Express | अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

Next

अकोला: अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. एक्स्प्रेसमध्ये बेवारस बॅग असून, त्यामध्ये बॉम्ब असल्याची अफवा उडाल्याने रेल्वे पोलिसांनी तातडीने अकोला बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. एक्स्प्रेस अकोला रेल्वे स्थानकावर आल्यानंतर बॉम्ब शोधक, नाशक पथकाने बॅगची तपासणी केली असता यामध्ये धोकादायक असे काहीही न आढळल्याने प्रवाशांसह अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय मराते यांना स्टेशन मास्टर यांनी माहिती दिली की, अहमदाबाद- हावडा या एक्स्प्रेस रेल्वेमधील कोच नंबर एस-३ मधील बर्थ नं. ३३ वर एक बेवारस बॅग आढळून आली आहे. या माहितीवरून रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविले. त्यानंतर वजनदार आणि संशयास्पद दिसणारी बॅग रेल्वेतून उतरवून पोलीस ठाण्यात आणण्यात आली. यावेळी बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. बॉम्ब शोधक पथकाने बॅगेची पाहणी केली असता ती बॅग गुजरातमधील जामनगर येथे कार्यरत असलेल्या सैनिकाची असल्याची खात्री झाली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली असून, सैनिकाशी संपर्क साधून त्याला ती बॅग सुपूर्द करण्यात येणार आहे.

 

Web Title: unmanageable bag was found in Ahmedabad-Howrah Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.