अधीक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार

By admin | Published: January 6, 2016 02:02 AM2016-01-06T02:02:13+5:302016-01-06T02:02:13+5:30

कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील आश्रमशाळेतील प्रकार.

Unnatural offenses against a minor student by the Superintendent | अधीक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार

अधीक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार

Next

वाशिम : कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील आश्रमशाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर अधीक्षकानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी धनज बु. पोलिसांनी अधीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. पिंप्री मोडक येथील निवासी आश्रमशाळेचा अधीक्षक वसंत सोळंके पीडित १२ वर्षीय विद्यार्थ्याला १५ दिवसांपासून त्रास देत होते. ३0 डिसेंबरच्या मध्यरात्री दारू पिऊन तो या विद्यार्थ्याच्या खोलीत गेला. त्या वेळी ४0 मुले या खोलीत झोपली होती. परंतु, दमदाटी करीत सोळंकेने आपल्याशी बळजबरी कुकर्म केले, असे कामरगाव येथील रहिवासी असलेल्या पीडित मुलाने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Unnatural offenses against a minor student by the Superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.