अकोला : असंघटीत क्षेत्रातील मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 03:41 PM2018-11-28T15:41:51+5:302018-11-28T15:43:13+5:30
अकोला : असंघटीत क्षेत्रातील मजुरांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बिल्डिंग पेन्टर्स बांधकाम मजुर असोसिएशनच्या झेंड्याखाली एकत्र येत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले.
अकोला : असंघटीत क्षेत्रातील मजुरांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बिल्डिंग पेन्टर्स बांधकाम मजुर असोसिएशनच्या झेंड्याखाली एकत्र येत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले.
बिल्डिंग पेन्टर्स बांधकाम मजुर असोसिएशन सातत्याने मजुरांच्या न्याय व हक्कासाठी शासन दरबारी लोकशाही मार्गाने आंदोलन करत लढा देत आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, सचिव प्रशांत मेश्राम, उपाध्यक्ष अब्दुल बशीर, पंचशिल गजघाटे, मनोज बाविस्कर, भास्कर सोनोने, अनिल वाघमारे यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. यावेळी धरणे मंडपात आत्माराम साठे, शेख लाल, अब्दुल जमीर, शेख अय्युम, सुनिल तायडे, अनिल येलकर, मदन वासनिक, सुरेश कारंडे, गणेश सावळे, विनोद तायडे, सतिष वाघ, शेख अशफाक, शेख इमरान, सैयद मर्दान, सदानंद तायडे, सुनिता नृपनारायण, राजु किर्तक, प्रकाश वाडे, शेख रशिद, शेख शकील, अजाबराव भटकर, दादाराव सरदार, प्रकाश वंजारी, सुनिल वानखडे, अब्दुल रशिद, शेख मुनिर, शेख जाकीर, सैयद मकसुद यांच्यासह अनेक मजुर उपस्थित होते.
या आहेत मागण्या
नोंदणीकृत मजुरांना दारिद्र रेषेखालील शिधापत्रिका देण्यात यावी.
आयुषमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्यावा.
घर दुरुस्तीसाठी ३ लाख व घर बांधणीसाठी ५ लाखांचे अनुदान द्यावे.
सांस्कृतिक भवन मंडळामार्फत निर्माण करून देण्यात यावे.