प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेचा असंघटित कामगारांनी लाभ घ्यावा - डॉ. रणजित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 02:19 PM2019-03-06T14:19:14+5:302019-03-06T14:19:54+5:30
अकोला: केंद्र शासनातर्फे असंघटित कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे मंगळवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हास्तरावर उद््घाटन केले.
अकोला: केंद्र शासनातर्फे असंघटित कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे मंगळवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हास्तरावर उद््घाटन केले. या योजनेचा असंघटित कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे मंगळवारी या योजनेचे जिल्हास्तरावर उद््घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच त्यांचे मासिक उत्पन्न किमान १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, जे कामगार कर्मचारी विमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सभासद नाहीत अशा असंघटित कामगारांसाठी ही योजना असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र्र लोणकर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय निधी अकोला क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक भविष्य निधी आयुक्त सुशांत पाटील आदींची उपस्थिती होती.
प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
नियोजन सभागृहात आयोजित उद््घाटन कार्यक्रमादरम्यान अहमदाबाद येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे राष्ट्रीय स्तरावर उद््घाटन करण्यात आले. या प्रसंगी त्याचे थेट प्रक्षेपण सभागृहात दाखविण्यात आले.