अकोटात बेफिकिरी वाढली, बाजारपेठेत गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:17 AM2021-04-14T04:17:11+5:302021-04-14T04:17:11+5:30
अकोट : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तरी अकोट शहरात नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. शहरातील ...
अकोट : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तरी अकोट शहरात नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. शहरातील बाजारपेठेत रस्त्यांवर नागरिकांची गर्दी कायम असल्याचे चित्र आहे. प्रशासनाची कारवाई थंडावल्याने नागरिक विना मास्क फिरत असल्याचे दिसून येत आहेत.
वीक एण्ड लाॅकडाऊनला नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याचे दिसून आले; काहीजण विनाकारण बाजारपेठ व रस्त्यावर फिरताना दिसून येत होते. अनेक जण सुसाट वेगाने गाड्या चालून शहरातील रेसिंग घेताना आढळून आले. जवाहर रोडवरील मुख्य बाजारपेठेत शासनाचे नियमांचे उल्लघंन करीत दुकाने उघडी होती. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फळविक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. यावेळी अनेकांनी मास्क लावलेला दिसून आला नाही. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अकोट तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. नगर परिषद पथकाने प्रतिबंधक क्षेत्र फलक लावण्याची कारवाई सुरू केली, परंतु शासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. (फोटो)