बेशिस्त ऑटाेचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:46+5:302021-02-08T04:16:46+5:30
अकाेला : शहरात बेशिस्त ऑटाेचालकांमुळे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. राेडवरून ऑटाे चालविताना पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा विचार न ...
अकाेला : शहरात बेशिस्त ऑटाेचालकांमुळे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. राेडवरून ऑटाे चालविताना पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा विचार न करता प्रवासी दिसताच अचानक ब्रेक दाबून ऑटाे थांबविण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ हाेत आहे.
अतिक्रमणाने वाहतुकीला खाेळंबा
अकाेला : शहरात माेठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीला माेठी अडचण निर्माण झाली आहे. महापालिकास प्रशासन व वाहतूक शाखेने यावर ताेडगा काढण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
जैविक कचरा रस्त्यावर
अकाेला : शहरातील बहुतांश हाॅस्पिटलकडून जैविक कचऱ्याची याेग्यरीत्या विल्हेवाट लावण्यात येत नाही. त्यामुळे जैविक कचऱ्याचे ढीग रस्त्यावर दिसत आहे. रामनगर परिसरात हे प्रमाण प्रचंड असून, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
श्वानांचा हैदाेसअकाेला : माेठी उमरी रेल्वेपुलाजवळ मोकाट श्वानांचा हैदाेस वाढला आहे. येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांवर श्वान धावत असल्याने वाहन घसरून अपघात होत आहे. यात अनेकांना दुखापत झाली आहे. मनपा प्रशासनाने या श्वानांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.