अकोला जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपीटचा तडाखा, रब्बी पिकांचे नुकसान
By Atul.jaiswal | Published: February 27, 2024 02:05 PM2024-02-27T14:05:28+5:302024-02-27T14:05:43+5:30
बार्शीटाकळी व पातुर तालुक्यातील फळबागांचेही मोठे नुकसान झाले असून, पालेभाज्यांना फटका बसला आहे.
अकोला : जिल्ह्यात सोमवार, २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटने जोरदार तडाखा दिला.
बार्शीटाकळी, तेल्हारा, अकोट, पातूर, बाळापूर, मुर्तीजापूर व अकोला तालुक्यातील बहुतांश गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गारपीटमुळे शेतात उभे असलेले गहु, उन्हाळी ज्वारी, हरभरा पिक भुईसपाट झाले. तर काढणी करून ठेवलेल्या गहु व हरभऱ्याच्या ढीगांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
बार्शीटाकळी व पातुर तालुक्यातील फळबागांचेही मोठे नुकसान झाले असून, पालेभाज्यांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत व तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.