अवकाळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 10:53 AM2020-01-03T10:53:47+5:302020-01-03T10:54:09+5:30

हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.

Unseasonal rains hit crops in Akola district | अवकाळी पावसाचा पिकांना फटका

अवकाळी पावसाचा पिकांना फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळासह गारपीट झाल्याने कपाशी, तूर, हरभरा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नया अंदुरा : नया अंदुरा परिसरात २ जानेवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. हरभरा, गहू, कपाशी व तूर या पिकांच्या पानांची चाळणी झाली. त्यामुळे पिकांना लावलेला खर्चही निघत असल्याची शक्यता वाढल्याने नया अंदुरा, कारंजा, रमजानपूर, निंबा फाटा शेतशिवारातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील परतीच्या पावसाने आधीच सोयाबीन, उडीद व मूग या पिकांचा हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना तूर, कपाशी व रब्बी हंगामातील हरभरा व गहू या पिकांकडून मोठी आस होती; परंतु अचानक २ जानेवारी रोजी पहाटे अचानक विजेच्या कडकडाटासह वादळवाºयासह गारपीट झाली. त्यामुळे हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. सतत शेतकºयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने पिकांचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
गत आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर धुके आणि आता पाऊसही पडला आहे. काही पिकांना पाऊस, थंडी व धुक्याचा फटका बसत आहे. धुक्यामुळे पिकावरील पात्यांवर मोठ्या प्रमाणात दव जमा होत आहे. दरवर्षी वाढता उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात हाती येणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. निसर्गाचा लहरीपणा, पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (वार्ताहर)

पहाटे गारपीट
 बोरगाव वैराळे, अंदुरा शेतशिवारात गुरुवारी पहाटे गारपीट झाली. अचानक विजेचा कडकडाट होऊन जोरदार वादळवारा सुटला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. या गारपिटीमुळे गहू आणि हरभरा या पिकांना फटका बसला आहे. यावर्षी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकाकडून मोठी आशा असताना रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला.
४बाळापूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी व कपाशी पिकांना सततच्या पावसाचा फटका बसला. शेतीला यावर्षी मोठा खर्च लागला असून, पिकांचे मातेरे झाल्याने लावलेला खर्चही वसूल झाला नाही.
४कपाशीवर बोंडअळीची सुरुवात झाल्याने परिसरातील कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही ही कीड नियंत्रणात येण्याची शक्यता नाही. बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत असताना अळीने आक्रमण केले आहे. नव्याने तयार होत असलेली कपाशीची बोंडे किडलेली दिसून येत आहेत. त्यामुळे हताश होऊन शेतकरी कपाशीच्या पिकात जनावरे सोडून उलंगवाडी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

 हातरूण

बोरगाव वैराळे, अंदुरा परिसरात गुरुवारी पहाटे वादळवारा व पावसाने हजेरी लावली. बोरगाव वैराळे परिसरात गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. आठवडाभरात पावसाने दुसºयांदा हजेरी लावली. ग्रामीण भागात गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळवाºयासह अवकाळी पाऊस झाला. वादळवारा आणि अवकाळी पाऊस यामुळे तूर, हरभरा, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे.

 बाळापूर

तालुक्यातील हातरूण, बोरगाव वैराळे, दुधाळा, मंडाळा, लोणाग्रा, हातला, निमकर्दा, मांजरी, अंदुरा, शिंगोली, मालवाडा भागात अवकाळी पाऊस झाला. तूर, हरभरा, गहू, ओवा व कपाशी या पिकांना वादळवारा व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

Web Title: Unseasonal rains hit crops in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.