डाकसेवक संघटनेचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 07:55 PM2017-08-16T19:55:00+5:302017-08-16T19:56:24+5:30

The unstoppable relation of the Postal Service | डाकसेवक संघटनेचा बेमुदत संप

डाकसेवक संघटनेचा बेमुदत संप

Next
ठळक मुद्देवेतन आयोग लागू करण्याची मागणीअकोला विभागातून १00 टक्के कर्मचारी संपावर

 


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वेतन आयोग लागू करण्यास शासनाकडून होत असलेल्या चालढकलीविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच इतर मागण्यांच्या सर्मथनार्थ अखिल भारतीय डाकसेवक संघटनेने बुधवार, १६ ऑगस्टपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला असून, या आंदोलनाचा भाग म्हणून अकोला विभागातील डाकसेवकही बेमुदत संपावर गेले आहेत.
कमलेशचंद्र यांच्या वेतन आयोगाने अहवाल सादर करून दीड वर्षांचा कालावधी लोटून गेल्यानंतरही शासनाकडून आयोगाची अंमलबजावणी झाली नाही. याबाबत संघटनेने एप्रिल महिन्यात संपाचा इशारा दिल्यानंतर सरकारने दोन महिन्यांत आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्‍वासन दिले. ही घडामोड होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही वेतन आयोग लागू झाला नाही. उलट आयोगाच्या शिफारशींमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न डाक विभाग करीत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. तातडीने आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, डिपार्टमेंटल पेन्शन देण्यात यावे व आठ तास काम देण्यात यावे, या मागण्यांसाठी संघटनेने देशभर संप पुकारला आहे. अकोला विभागातून १00 टक्के कर्मचारी संपावर असल्याचे विभागीय सचिव तथा सहसचिव महाराष्ट्र सर्कल हेमंत कुमार फाटकर यांनी कळविले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अकोला येथील मुख्य डाकघरासमोर कर्मचारी संपावर बसले आहेत. यामध्ये पी. पी. बोळे, डी. पी. तायडे, आर. डी. नांदुरकर, गोपाल पवार, डी. एच. खडसे, सागर गव्हाळे, मनोज पारसकर, एम. एस. काळे, एम. के. शर्मा, आर. आर. थोरात, जगताप, राहुल वाहुरवाघ, अंभोरे, गोपाल अमतकर, व्ही. एस. बागडे, निकोसे, डाबेराव आदी कर्मचारी उपस्थित होते. मागण्या मंजूर होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे विभागीय अध्यक्ष बी. बी. ओझा यांनी कळविले आहे.

Web Title: The unstoppable relation of the Postal Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.