‘पीएम-किसान’ योजनेतील शेतकऱ्यांची माहिती सात दिवसांत अद्ययावत करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:27 AM2020-09-08T11:27:31+5:302020-09-08T11:27:41+5:30
माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ)व तहसीलदारांना दिले.
अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांच्या माहितीमधील त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम सात दिवसांत पूर्ण करून माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ)व तहसीलदारांना दिले.
‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामाचा आढावा जिल्हाधिकाºयांनी घेतला. त्यामध्ये योजनेंतर्गत लाभार्थी शेतकºयांच्या नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक इत्यादी माहितीमधील त्रुटींची दुरुस्ती करून शेतकºयांची माहिती सात दिवसात अद्ययावत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले, तसेच जिल्ह्यातील सर्वच पिकांच्या पाहणीचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. या ‘ व्हिडओ कॉन्फरन्सिंग’मध्ये निवासी उप-जिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार सहभागी झाले होते. महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महसूल विभागाच्या जिल्ह्यातील अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही निश्चित करण्यात आले.