दिव्यांग शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:33 AM2021-03-13T04:33:17+5:302021-03-13T04:33:17+5:30
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य ...
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार दिव्यांग शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करण्याचे काम शिक्षण विभागामार्फत बुधवारपासून सुरू करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत दिव्यांग शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांची सेवाज्येष्ठता अद्ययावत करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला नऊ मार्च रोजी दिले. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. १२ मार्च रोजी दिव्यांग शिक्षकांची प्रारूप सेवाज्येष्ठता यादी शिक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात येणार असून, सात दिवसांत या यादीवर आक्षेप मागविण्यात येणार आहेत. आक्षेप निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांची अद्ययावत सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यात येणार आहे.