अकोला जिल्ह्यातील रस्ते मॅपिंगचा अद्ययावत अहवाल मागवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 02:15 PM2019-05-07T14:15:16+5:302019-05-07T14:15:21+5:30
जिल्ह्यातील रस्ते मॅपिंग, मागासवर्ग वस्ती मॅपिंगचा अद्ययावत अहवाल तयार करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी दिले.
अकोला: जिल्ह्यातील रस्ते मॅपिंग, मागासवर्ग वस्ती मॅपिंगचा अद्ययावत अहवाल तयार करा, सोबतच बांधकामाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईचा अहवाल तयार करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी विभागप्रमुखांना सोमवारी आढावा बैठकीत दिले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात विविध विषयांची आढावा सभा पार पडली. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. सभेमध्ये बांधकाम विभागाने रस्ते मॅपिंग प्रगती अहवाल वेळोवेळी सादर करावा, बांधकाम विभागाची मंजूर कामे करताना कार्यादेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाºया कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केल्याचा तसेच वसुलीचा प्रगती अहवाल सादर करणे, समाजकल्याण विभागाने मागासवर्गीयांच्या वस्ती मॅपिंग अहवाल सादर करावा, सर्व विभागांनी सर्व योजनेचे उपयोगीता प्रमाणपत्र ८ मे पर्यंत सादर करावे, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीचा अहवाल मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे सादर करावा, ३३ कोटी वृक्ष लागवडीचे खड्डे १० मे पर्यंत पूर्ण करणे, डेटा अपलोडिंग करणे, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाचे १०० टक्के फोटो अपलोडिंग करणे, मान्सूनपूर्व पाणी नमुने तपासणी उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करणे यासह विविध विषयाचा बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जगदीश मानमोठे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष पाटील, राजेंद्र भटकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय उंबरकार, चक्रनारायण, श्रीमती चंदन, खारोडे, मसराम यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.