कर्जमाफीसाठी पात्र १० हजार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 03:48 PM2020-02-02T15:48:11+5:302020-02-02T15:48:17+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शनिवारी १० हजार ९८१ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत.

'Upload' lists of 10,000 farmers eligible for loan waiver! | कर्जमाफीसाठी पात्र १० हजार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!

कर्जमाफीसाठी पात्र १० हजार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!

Next


अकोला : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शनिवारी १० हजार ९८१ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख १३ हजार ८४९ शेतकºयांपैकी १ लाख १२ हजार ६८० शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले आहे. बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आलेल्या पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये १ फेबु्रवारी रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्जमाफीसाठी पात्र १० हजार ९८१ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत.

 

Web Title: 'Upload' lists of 10,000 farmers eligible for loan waiver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.