पात्र ८४  हजार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:24 PM2020-02-04T12:24:41+5:302020-02-04T12:25:04+5:30

सोमवारपर्यंत ८४ हजार ५१५ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या ‘पोर्टलवर’ अपलोड करण्यात आल्या.

'Upload' lists of 84,000 farmers eligible | पात्र ८४  हजार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’

पात्र ८४  हजार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’

googlenewsNext

अकोला : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत ८४ हजार ५१५ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या ‘पोर्टलवर’ अपलोड करण्यात आल्या.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया १ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आली आहे. सोमवार, ३ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र ८४ हजार ५१५ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड ’ करण्यात आल्या असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक व व्यापारी बँकांच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सोमवारपर्यंत ८४ हजार ५१५ शेतकºयांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या.
- संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी

 

Web Title: 'Upload' lists of 84,000 farmers eligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.